fbpx

Spiritual Maths: 1 – 1 = ( 1 – 1 ) + ( 1 – 1 )

30
Jun
2010
Politics can be of addition,
Addition of friendly allies!
Samsara is also nothing but addition,
Addition of more materials!
Religiousness also involves addition,
Addition of varied concepts & methods!
In all everything involves & revolves around Addition.. Collection!
How useful is that addition…..You know it better! 🙂
Whereas Spirituality is always a Subtraction.
Subtraction of an apparent Everything-ness…
in to a residual, ever existing Nothingness!
Love n Regards,
Nitin Ram
30 JUNE 2012
Ps.: No IM* please.
*******************
आध्यात्मिक गणित : १ – १ = ( १ – १ )  +  ( १ – १ )
राजकारण… बेरजेचे,
समाजकारण… बेरजेचे,
संसार…बेरजेचा,
धार्मिकताही… बेरजेची;
एकूण काय सर्व गोळाबेरिजच !
राजकारणात आहे मित्रांची, शत्रूंची, समविचारी पक्षांची बेरिज,
समाजकारणात आहे समाजोपयोगी विचारांची बेरिज,
संसारात आहे धन, पद, प्रतिष्ठेची बेरिज,
तर….धार्मिकतेमधे आहे भयापोटी झालेली धार्मिक आचार्-विचारांची बेरिज,
एकूण काय तर सर्व गोळाबेरिजच!!
उपयोगी का निरुपयोगी…. ते तुम्हालांच माहीती..!!!! 🙂
पण
अध्यात्म मात्र्….. कायमच वजाबकीचे……
वजा’बाकी‘ करून नंतर उरलेल्या (नुरलेल्या) बाकीचे !! 🙂
अनंत शुभेच्छा!
नितीन राम

www.abideinself.blogspot.in
Whatever the question, Love is the Answer!

6 Comments
 1. नितिन राम ,

  स आ वि वि
  तू ग्रेट आहेस. तुला लिहिणे सहज सुचते. तुला अनेक प्रणाम !
  You are ahead of everything that is what i know.

  Keep it up and do write to me i love reading your literature.

  -nanda thakar

  Reply
  1
 2. धन्यवाद.

  'असणे' हे 'नसण्या'पेक्षा वेगळे कुठे आहे…. 'असणे' हे 'नसण्या'चे फक्त दृश्य रूप आहे. 'असणे' हे जर बाह्यांग असेल तर 'नसणे' हे त्याचेच अंतरंग आहे! काय आंत आणि काय बाहेर्…जे आंत आहे त्यापेक्षा बाहेर काहिच तर वेगळे नाहि ना !! असणे किंवा नसणे हे दोन्हीही क्षणिक आभासच…. ह्या आभासांना जाणणारा…त्याचे वर्णन मात्र करता येत नाही.. आणि न करता राहवतही नाही! अशी सगळी ही गंम्मत आहे ! 🙂

  सप्रेम अनंत शुभेच्छा

  नितीन

  Reply
  2
 3. नितीन,

  very very appropriate. well said.

  -Uday

  Reply
  3
 4. १/० = २/० = ………. = क्ष/०

  दिसेल त्या आकड्याला शून्याने भागण्याची कला म्हणजे अध्यात्म. "अनंत" शुभेच्छा!

  (सरळ रेषा ही अनंत व्यास असणारे वर्तुळ असते आणि बिंदू हे शून्य तिज्या असणारे वर्तुळ असते. त्यामुळे भलतेच उपद्व्याप आणि ध्यानाचे प्रयोग वगैरे करत गोलगोल फिरणार्या मनाला शेवटी आपण सरळ रेषेतच चालत होतो हे जोवर समजत नाही तोवर मनोव्यापाराच्या वर्तुळाची त्रिज्या शून्य होऊन ते ध्यानबिंदूत विलीन होत नाही. ते विलीन झाले असा भास झाला तरी ते तसे मुळातच होते, नव्याने काही आली नाही वा गेले नाही हे जाणले असा दावा ठोकत परत गोलगोल फिरायची स्वच्छंदपणे मोकळीक घेता येते असा हा सगळा निओ-अद्वैताचा सरळ, सोपा आणि गोलमाल पोरखेळ आहे. असो. )

  -हरिभक्त (गुरु., २३/१२/२०१० – १४:५०).

  Reply
  4
 5. तुम्ही मुक्त झालात आता जनकल्याण करा.
  थुंकलेल्या च्युईंग गम चे प्रदर्शन मांडा आणि चाहते गोळा करा.

  -इस्वास (मंगळ., २१/१२/२०१० – ११:०४).

  Reply
  5
 6. धन्यवाद 🙂
  येथे मुक्त होण्यासाठी बंधनात कोण आहे! बंधन आणि मुक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 🙂 काहिही घडलेच नाहीये त्यातील हा सारा खेळ आहे. खेळ आहे ह्याचा बोध झाल्यावरही खेळ पुर्ववत चालूच राहतो, पण कायमचेच मिटते ते म्हणजे दुख:, उरतो फक्त अकारण आनंद! अशी ही गंम्मत आहे. :-)!

  सप्रेम नमस्कार 🙂

  Reply
  6

Leave a Reply

Top