श्रद्धा म्हणजे काय?
- posted in: Uncategorized
- 0 comments

![]() |
Picture Courtesy: Dr Vaishali Kute
|
सहज जाता जाता एक दिवस वाटेत चंद्राची सावली भेट्ली.
म्हणाली… चंद्र नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, चंद्र असणारच ना कोठे न कोठे…!!!
सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक पारधी भेट्ला.
म्हणाला… सावज नसते जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, सावज असणारच ना कोठे न कोठे…!!!
सहज जाता जाता एक दिवस वाटेत तहान भेट्ली.
म्हणाली… पाणी नसते जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, पाणी असणारच ना कोठे न कोठे…!!!
सहज जाता जाता एक दिवस वाटेत मधमाशी भेट्ली.
म्हणाली…मध नसता जर इथे तर नक्कीच मीही नसते इथे!
मी आहे इथे म्हणजे, मध असणारच ना कोठे न कोठे…!!!
सहज जाता जाता एक दिवस वाटेत एक कुलूप भेट्ले.
म्हणाले… किल्ली नसती जर इथे तर नक्कीच मीही नसतो इथे!
मी आहे इथे म्हणजे, किल्ली असणारच ना कोठे न कोठे…!!!
नम्र विनंती… काळजी नसावी…. ! 🙂
जय गुरु
-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!
0 comments