fbpx

देव सापडत का नाही???

19
Jul
2012

कसा सापडेल बरं…??
देव बसला आहे
भक्ताच्या पायापाशी…
सतत… अविरत!
आणि… भक्त मात्र शोधतो आहे
त्याला डोक्याने… सैरा-वैरा…!
भक्ताला वेळच नाहीये…
थोडे वाकून बघण्यासाठी…
जरासे झुकण्यासाठी…
थोडे थांबण्यासाठी…
त्याला ओळखण्यासाठी…
स्वतःला जाणण्यासाठी….

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
११ जुलै २०१२
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

5 Comments
 1. Now that's a classic Poem! Sir! Very very true, and very very correct!

  -Hrishi

  Reply
  1
 2. Dear Nitin,

  Hyala bhakta mhanayache ka?

  Love.
  Jai-Mohan.

  Reply
  2
 3. Dear Nitin Ram

  देव पहाण्यासाठी देवच व्हावे लागते.

  आत्मा स्वरूप पाहून मौनात राहणारा खर्या अर्थाने महापुरुष होय असे भाऊसाहेब महाराज म्हणतात.

  Reply
  3
 4. @Ramkrishna:

  "आत्मा स्वरूप पाहून मौनात राहणारा खर्या अर्थाने महापुरुष होय असे भाऊसाहेब महाराज म्हणतात." – इति रामकृष्ण

  गंमतच आहे की… सदगुरु भाऊसाहेब महाराज स्वतः आयुष्यभर बोललेच की सर्व शिष्यांशी… नसते बोलले तर प्रा. रानडे, सिद्धरामेश्वर महाराज इत्यादी शिष्य कसे तयार झाले असते… मग निसर्गदत्त महाराज कसे तयार झाले असते…आणि तुम्हा-आम्हाला…कसे भेटले असते ??????? ते मौनातून बोलले…बुद्धदेखील मौनातून बोलले… निसर्गदत्त देखील मौनातून बोलले….. सर्व बोल मौनातीलच आहेत रामकृष्ण भाऊ….! ऐकणार्‍याचे कान जर शब्दाने भरलेले असतील तर त्याला मौन कसे कळणार…कसे ऐकू येणार??? शब्दाला दिसेल फक्त शब्द…आणि निशब्दाला…फक्त निशब्द!
  येथे देणार्‍यावर काही अवलंबून नाही…घेणार्‍यावर मात्र सर्व अवलंबून आहे….! घेणार्‍याची आंतरिक स्थिती ….कशी आहे त्यावर सर्व अवलंबून आहे…म्हणून तर भाऊसाहेब, निसर्गदत्त, गुळवणी महाराज किंवा कोणीही सतगुरु असो…देहात असताना त्यांना अनंत माणसे भेटली…पण सर्वच त्यावेळी आत्मबोधाला उपलब्ध झाली का..??

  विषबाधेवर औषध असू शकते… भूतबाधेवर उपाय असू शकतो…पण 'भूतकाळाच्या' बाधेवर काय उपाय…??????
  काळाचा मृत्यू ..एवढाच उपाय असू शकतो कदाचित…. बाळाचा नव्हे…काळाचा…! जो पर्यंत देहबुद्धी आहे तो पर्यंत काळ आहे… काळ नाहीसा झाला की…आपसूकच भूतकाळाचे भूत उतरून जाते आणि मग उरतो तो फक्त नावाविना…वर्तमान….! 🙂

  सप्रेम नमस्कार आणि अनंत आभार….. सदगुरु समर्थ !

  घंटा:
  http://abideinself.blogspot.in/2011/01/blog-post_21.html

  Reply
  4
 5. @ Hrishi: Thanks Hrishi!
  @Jai-Mohan: होना…खरय…पण सर्वसामान्यपणे अशाच पद्ध्तीचे भक्त पहायला मिळतात. त्यांना भक्त म्हणायचे की अजून काही हे मला माहीत नाही. सप्रेम…जय गुरु

  Reply
  5

Leave a Reply

Top