fbpx

“विवेक” म्हणजे काय?

16
Jan
2013

“विवेक” म्हणजे आध्यात्माचे परमोच्च शिखर… अर्थातच भूमिहीन शिखर.
“विवेक”
म्हणजे… आपल्या “असण्याला”, अस्तित्वाच्या चौकटीची आवश्यकता नाही, हे पक्के ओळखणे. “विवेक” म्हणजे, आपल्याच सनातन… निर्गुण… निराकार…
निराधार… “असण्याला”, अस्तित्वाच्या म्हणजेच देह आकाराच्या चौकटीची
आवश्यकता नाही… हे पक्के ओळखणे. नुसते ओळखणेच नाही तर… “हे” आता… असेच
आहे… असेच… असेच आणि फक्त असेच आहे हे ओळखणे.
 “आपले असणे” हे केवळ
ह्या देहापुरते मर्यादीत नसून ते देह-आकाराच्या अलिकडचे आणि पलिकडचे आहे हे पक्के ओळखणे.
ह्या पलिकडे अजून जाणण्यासारखे काही सत्य नाही… हे ओळखणे. हिच शांती आणि हीच परम-विश्रांती. J 
श्रद्धा किंवा ज्ञान/बुद्धी/विचार ही जर कळी असेल तर “विवेक” म्हणजे उमललेले फूल आणि ‘बोध’ म्हणजे त्यातून दरवळणारा सुगंध. “विवेक” म्हणजे श्रद्धेचा किंवा ज्ञानाचा कडेलोट आणि अर्थातच मग तथाकथित शोधाचा आणि अभ्यासाचाही. 
“विवेक” म्हणजे… जे आपलेच आहे त्याचा परिपूर्ण बोध… मग ‘जे आपलेच आहे’ त्यासाठी श्रद्धा किंवा संशय कशासाठी लागतो बरे? म्हणूनच एकदा परिपूर्ण विवेक सधला की संशयतर मिटतोच पण श्रद्धा सुद्धा मिटून जाते. आपल्याला आपण ओळखल्यानंतर विचारांची गरज उरतेच कुठे??
आता समजा
तुमचे नाव ‘संजय’ आहे तर मग ‘संजय’ नावावर तुमचा संशय किंवा श्रद्धा आहे? जे तुमचे
नाव आहे त्यावर संशय कसा येणार आणि श्रद्धा ठेवायचीतरी गरज आहे का हो? सूर्यावर तुमचा
संशय आहे किंवा श्रद्धा आहे? सूर्य
आहेच हे तुम्ही अनुभवातून जाणता ना मग त्यावर संशय कसा ठेवणार आणि त्यावर श्रद्धा ठेवायची
तरी कुठे गरज आहे. तुम्ही पुरुष किंवा स्त्री आहात ह्यावर तुमचा संशय किंवा श्रद्धा
आहे?  रोज सकाळी घरातून कामाला बाहेर पडताना… तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता
लक्षात ठेवावा लागतो का हो ? रोज कार/गाडी चालवायला बसल्यावर तुम्हाला लक्षात
ठेवावे लागते का हो… की पायापाशी डावीकडचा क्लट्च… मधला ब्रेक आणि उजवीकडे एक्सिलरेटर. जी गोष्ट लक्षात ठेवावी लागते किंवा विसरली जाते ह्याचा अर्थ असा की त्याबाबत
अजून “विवेक” झालेला नाही अन्यथा पाठांतर करायची गरजच उरत नाही ना…! जो
पर्यंत “विवेक” घडत नाही तोपर्यंत अभ्यास आहे… पाठांतर आहे… आणि
“विवेक” सधताच जो निराधार “बोध” उघड होतो ना… तो मात्र…. पाठांतराविना निरंतर आहे. J 
हाच
“विवेक”…! ‘जे आपलेच आहे’… ‘ते’… केवळ बुद्धीने जाणणे
उपयोगाचे नाही तर ते आत्मसात होणे गरजेचे आहे… म्हणजेच आपलेसे होणे… इतके सहज की
‘ते आपले आहे’ ह्याची आठवणसुद्धा राहात नाही. 
विवेकाविना असलेले ज्ञान म्हणजे शब्दावर आधारीत ज्ञान जसा तबल्यावर थाप पडताच उमटणारा … आहत नाद. अज्ञान म्हणजे जणू मावळलेला सूर्य… तर विवेकाविना असणारे ज्ञान म्हणजे ग्रहणाने झाकोळलेला… ग्रहणग्रस्त सूर्य.
विवेक सधल्यानंतर (साधल्यानंतर नव्हे) … स्व-बोधानंतर… दैनंदीन
हालचाल चालूच राहते पण शोधरुपी चुळबुळ मात्र बंद होते. जसे सूर्य कोठूनही येत नाही
आणि कोठेही, कधीही जात नाही ह्या वस्तुस्थितीचा विवेक झाल्यावर आपल्याला सूर्योदय आणि
सूर्यास्त हे शब्द्प्रयोग त्रास देत नाहीत ना… अगदी तसेच. शोध म्हणजे बोधाची अनुपस्थिती…
आणि बोध म्हणजे शोधाची. हालचाल आणि चुळबुळ ह्या दोन्हीमध्ये बाह्यांगाने काही फरक नाही…पण
दोन्हीमागे जो ‘मूळ उद्देश’ (इन्टेंशन) आहे त्यावरून ज्याचे त्याला नक्कीच कळते की
त्याची… हालचाल चालू
आहे का चुळबुळ….! J  आत्यंतिक तळमळीमधून
सदगुरु कृपा प्रकट होते आणि सदगुरु कृपेने विवेकरुपी सुगंध! जय गुरु!
सप्रेम सलाम
नितीन राम
११ जानेवारी २०१३
www.abideinself.blogspot.com                                                  
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.

Related
Posts:शून्याचा
पाढा: https://nitinram.com/new/2009/03/06/blog-post_05-3/

घंटा:  http://abideinself.blogspot.in/2011/01/blog-post_21.html

“बोध” म्हणजे काय…!: https://nitinram.com/new/2011/02/02/blog-pos-23/
अभ्यास का बोध..?: https://nitinram.com/new/2009/11/23/blog-post_23-2/
शाब्दिक बोध: एक अलंकारिक बंधन: https://nitinram.com/new/2011/03/01/blog-pos-22/
सप्रेम आठवण: https://nitinram.com/new/2010/10/12/blog-pos-26/
जे सदैव… तेच आत्मस्वरूप: http://abideinself.blogspot.in/2012/06/blog-post_30.html
शोध: https://nitinram.com/new/2011/03/27/blog-post_27/
दु:खके सब साथी… सुखमे न कोई: https://nitinram.com/new/2011/02/09/blog-post_09-2/
एक धारणा: “किल्ली लावली की कुलूप उघडते”: https://nitinram.com/new/2010/06/19/blog-post_18-2/
काहीच घडले नाही….!: https://nitinram.com/new/2009/05/08/blog-post_1178/

5 Comments
 1. Aprateem Awarnaniya!
  Thanks so much Nitin _()_

  Reply
  1
 2. Dear Nitin,
  Wonderful ,Wonderful,
  simply wonderful.
  Vivekacha kadeloat.

  Love.
  Jai-Guru.

  Reply
  2
 3. Hridaypoorvak dhanyawad…

  Reply
  3
 4. Awesome. Kindly translate in English.
  Much Regards

  Reply
  4
 5. Extremely beautiful nitin. 🙂

  "विवेक सधल्यानंतर (साधल्यानंतर नव्हे) … स्व-बोधानंतर… दैनंदीन हालचाल चालूच राहते पण शोधरुपी चुळबुळ मात्र बंद होते. जसे सूर्य कोठूनही येत नाही आणि कोठेही, कधीही जात नाही ह्या वस्तुस्थितीचा विवेक झाल्यावर आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्त हे शब्द्प्रयोग त्रास देत नाहीत ना… अगदी तसेच."

  Guru krupa ahe re baba tuzyavar. Farach sunder ani upayukt post ahe he. Abhari ahe.

  Reply
  5

Leave a Reply

Top