#बाळ थकले नि घरी पोचले
‘जाणीव’ नावाचे बाळ

बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात,
का बरं अस्वस्थ आहे स्वतःच्याच घरात…!!!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
काय बरं बोचते आहे त्याला स्वतःच्याच घरात…!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
काय बरं खेचते आहे त्याला एवढ्या जोरात…!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
काय बरं शोधते आहे शब्दांच्या केरात…!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
का बरं गुंतले आहे मनातल्या भ्रमात…!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात!
का नाही रमत एकदा… स्वतःच्याच सुरात…!
बाळ धावतंय पुन्हा पुन्हा दारात! 🙂
सप्रेम नमस्कार
-नितीन राम
२९ मे २०११
http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer