#वाळूचा किल्ला तो… तो तू नव्हे
तो ‘तू’ नव्हे !

जे येते आणि पुन्हा जाते… ते आकाश नव्हे!
जो येतो आणि जातो … तो प्रकाश नव्हे!
जी येते आणि जाते… ती आठवण नव्हे!
जी येते आणि जाते… ती ‘साठवण’ नव्हे!
जे येते आणि पुन्हा जाते… ते सुख नव्हे!
जो येतो आणि जातो … तो आनंद नव्हे!
जो येतो आणि जातो… तो तू नव्हे!
जो येतो आणि जातो… तो तू नव्हे!
जय गुरु
-नितीन राम
१७ सप्टेंबर २०११
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!