fbpx

सर्वस्व… आत्ता आणि इथे आहे.

घंटा

जेव्हा निसर्गदत्त समोर असतात तेव्हा रमण महर्षींची घंटा वाजत असते,
जेव्हा रमण महर्षी असतात तेव्हा रामकृष्ण परमहंसांची घंटा वाजत असते,
जेव्हा रामकृष्ण असतात तेव्हा शंकराचार्यांची घंटा वाजत असते,
जेव्हा शंकराचार्य असतात तेव्हा बुद्धांची घंटा वाजत असते,
जेव्हा बुद्ध उपस्थित असतात तेव्हा श्रीकृष्णाची घंटा वाजत असते,
जेव्हा कृष्ण समोर असतात तेव्हा श्रीरामाची घंटा वाजत असते.
जेव्हा श्रीराम उपस्थित असतात तेव्हा परशुरामाची घंटा वाजत असते……. 🙂

पण नाद … हा “अंतरनाद” मात्र कायमच आत्ता आणि येथे आहे!

मग का बरे कायमच मागचा, भूतकाळातील नाद ऐकू येतो! कारण साधकाची श्रद्धा, त्याचा विश्वास कायम भूतकाळावर आहे, त्याची आशा आहे भविष्यकाळावर आणि त्याचा संशय मात्र आहे वर्तमान काळावर….. त्यामुळे ‘ह्या’ संपूर्ण… परिपूर्ण क्षणाकडे त्याचे बिलकूल लक्षच जात नाही. जे कायम उपस्थित त्यावर संशय आणि जे अस्थिर त्यावर श्रद्धा… ! मी “वेगळा” ह्यावर अढळ श्रद्धा….. होण्यावर श्रद्धा… पोचण्यावर श्रद्धा…. भूतावर श्रद्धा…. उद्यावर श्रद्धा… आणि ‘सध्या’ वर, ‘आज’ वर मात्र संशय! बाह्यरुपांवर श्रद्धा… आणि ‘स्व-रूपा’वर मात्र संशय ! 🙂

ज्याला, ज्या क्षणी ‘अंतरनाद’ गवसला…. आत्ताचा वर्तमान सूर गवसला….. तत्क्षणात… अरूप असे आपलेच कायम स्व-रूप प्रत्येक रुपामध्ये सहज प्रकट होते.

सर्वस्व… आत्ता आणि इथे आहे.

सप्रेम _()_

-नितीन राम
०६ सप्टेंबर २०१०

http://www.abideinself.blogspot.com/
Whatever the question, Love is the Answer

*********************************

Top