fbpx

सुख आणि दु:ख

दु:खके सब साथी… सुखमे न कोई :-)

हिरा मिळाला तर जपून ठेवा…जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
इथे फारशी कोणाला त्याची गरज असत नाहि.
तहान लागलेली नसताना मिळालेले पाणी कोणाच्या बरे कामाचे!

हिरा मिळाला तर जपून ठेवा…जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
दु:खाची सवय असलेल्यांना, दु:खच जास्ती ओळखीचे असते.
द:खात रमलेल्यांना ‘सुख’, उलट जास्ती दु;खी करते.
आणि मग त्यांचे दु:ख तुम्ही पाहू शकणार नाही.

हिरा मिळाला तर जपून ठेवा…जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात….
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सर्व साथी दु:खातलेच, साथ म्हणजे दोन… द्वैत!
द्वैतातले सुख काय आणि दु:ख काय…
एकाच नाण्याच्या दोन बाजू!
पण “वास्तविक सुख” (आनंद) ते आहे ज्यात द्वैत नाही…
दु:खतर नाहिच पण सुख पण नाही. येथे दोन्हीला थारा नाही…
येथे ‘दोन’ला बिलकुल थारा नाही.
येथे दु:खाची चिंता नाही आणि सुखाची अपेक्षा पण नाही.
येथे सुखाची अपेक्षा असलेला असा कोणीच वेगळा नाही,
मग येथे ‘सुख’ जाणवणार तरी कोणाला!
येथे आहे अद्वैतानुभुती, द्वैतामध्येच राहून… अद्वैतानुभुती.
येथे आहे समाधान… अनायास समाधान.
येथे आहे … अकारण आनंद. येथे आहे शब्दातीत असे…. सर्वस्व 🙂 !

दु:खके सब साथी… सुखमे न कोई  🙂

हिरा मिळाला तर जपून ठेवा…जमलेच तर लपवून ठेवलेला बरा.
ज्याला पाहिजे आहे तो आपोआप येतो आणि घेउन जातो.
घेणारा आणि देणारा सुखरुप होतात….
घेणारा भरून जातो तर देणारा हलका :-).

सप्रेम _()_

-नितीन राम

१६ नोव्हेंबर २०१०

साथी: https://nitinram.com/new/2008/04/17/blog-post_16/

Top