#Only for Adults
मूळ स्वप्न कोणते ?* : (*फक्त प्रौढांसाठी)

![]() |
Picture Courtesy: Dr Vaishali Kute |
एक आहे झोपेतील स्वप्न… दुसरे आहे जागृतीमधील स्वप्न. दुसरे स्वप्न म्हणजे पहिल्याचे प्रतिबिंब. ह्या जागेपणीच्या स्वप्नामध्ये अनेक स्वप्ने जन्म घेत राहतात आणि विरून जातात. राजा भिकारी झाला काय किंवा भिकारी राजा झाला काय… सर्व ह्या स्वप्नामध्येच! मग ही स्वप्ने पूर्ण झाली काय आणि नाही झाली काय… सर्व एकच ना ? स्वप्नातल्या स्वप्नांचे काय ते मोल… काय ती किंमत..?
खरी किंमत आहे… हे ओळखण्यात की… हे जागृतीतील स्वप्न (जे एरवी… किंवा नेहमीच खरे वाटते) हे मूळतः स्वप्नच आहे… मग सर्व स्वप्ने लोप पावतात आणि जे कायम आहेच ते आपलेच सत्य-नित्य स्वरूप, सदगुरुकृपेने आपसुक उघडे पडते… मोकळे होते.
स्वप्न… स्व-पण… जाणीव…. हे मूळ स्वप्न आहे हे ओळखायचे आहे फक्त… त्यानंतर हे जागेपणीचे स्वप्न चालूच राहते परंतु फक्त स्वप्न म्हणून… मौज म्हणून… खेळ म्हणून. 🙂 मौजेमध्ये कसले बंधन आणि कसली मुक्ती..? 🙂 मुक्ती म्हणजे… मुक्तीच्याही कल्पनेतून मुक्ती आहे रे… !
अजून काही सांगण्यासारखे आहे का…? अजून काही ऐकण्यासारखे आहे का…? अजून काही वाचण्यासारखे आहे का…! अजूनही काही जाणण्यासारखे आहे का…!?
मला तरी नाही माहित…:-))
सप्रेम शुभेच्छा !
जय गुरु
-नितीन राम
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली… तेथे ओळख संपली.
Related Posts:
Life is an illusion, beyond doubt, beyond belief!
https://nitinram.com/new/2012/04/21/life-is-illusionbeyond-doubt-beyond/
माया म्हणजे काय? (What’s illusion?):
https://nitinram.com/new/2013/11/20/what-is-illusion/
Death is the Fallacy:
https://nitinram.com/new/2010/05/15/death-is-only-fallacy/
बंधू… तुला रे कसला मृत्यू!!
https://nitinram.com/new/2010/09/05/blog-post_05-2/