fbpx

Spiritual experiences…..Fun in Duality

“आध्यात्मिक अनुभव”

आध्यात्मिक अनुभवांची च्युंगम्स 
किती दिवस चघळत बसायची, 
ज्याची चवही आता पार बेचव झाली आहे….!!? 
त्याची खरी चव फक्त 
त्या अनुभवाच्या क्षणाचमध्ये होती 
आणि
त्या चवीमध्येच तर “कळाले” असते 
कि
“वास्तविक अनुभोक्ता” कोण आहे ते….!! 
परंतु “ज्याला अनुभव आला” त्याची, 
सत्य-नित्य ओळख झालीच नाही
तर 
त्या द्वैतातील अनुभवांचा, द्वैतातील खेळांचा… 
काय उपयोग आहे हो…!!?
 

आध्यात्मिक अनुभवांची च्युंगम्स 
किती दिवस चघळत बसायची, 
ज्याची चवही आता पार बेचव झाली आहे….!!? 
ज्याला अनुभव आला त्याची ओळख….
ज्याची त्याला ओळख्….
स्वतःची स्वतःला ओळख्…….
हा “बोध”च बास आहे. 

सप्रेम शुभेच्छा

-नितीन राम

२२ जुलै २००९

Top