fbpx

समाधान कोठे आहे…?

08
Sep
2011


Picture Courtesy: Vaishali Kuteह्याला भेटून किंवा त्याला भेटून,
खरी ‘भेट’ कधी होणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

ह्या आरश्यात पहा किंवा त्या आरशात,
खरं ‘दर्शन’ कधी होणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

वस्त्र, ह्या दोर्याने शिवा अथवा त्या सुईने,
‘निर्वस्त्र’ झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!

ह्या फुलाचा वास घ्या किंवा त्या फुलाचा,
स्वतःचा मूळ ‘वास*’ कधी उमजणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान ‘उघडणार’ नाही!

ह्या पाट्या शोधा किंवा त्या पाट्या,
‘शोधणारा’ हरविल्याशिवाय मात्र…
शोध नक्की संपणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान ‘उघड’ होणार नाही!

समाधान कोठे आहे…!!!?
जेथे आहात तेथेच आहे … अगदी तेथेच… अगदी येथेच! J

(वास*- मूळ वस्ती… मूळ अस्तित्व!)

सप्रेम नमस्कार

जय गुरु

-नितीन राम
०७ सप्टेंबर २०११

http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!

4 Comments
 1. "ह्या फुलाचा वास घ्या किंवा त्या फुलाचा,
  स्वतःचा मूळ 'वास*' कधी उमजणार नाही!
  स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
  खरं समाधान 'उघडणार' नाही!"

  –अप्रतिम, अद्वितीय!

  -सुजाता

  Reply
  1
 2. Dear Nitin,
  Ithe nahi tithe nahi, samadhan samadhanatach aahe.
  Love.
  Jaiguru.

  Reply
  2
 3. VAH VAH, FAR FAR CHHAN ||| PATLA. DHANYWAD. …..samant

  Reply
  3
 4. Dear Nitin.
  Good insight on searching true Self within (everywhere). Otherwise efforts do not work! The key is to know समाधान घेणारा खरा नाही. Then how come Samadhan be true? सम हा खरा धन आहे. Seeing none other selves but One Self is true Samadhan.

  Reply
  4

Leave a Reply

Top