#समाधान म्हणजेच समाधी आणि तेच स्वरुप
समाधान कोठे आहे…?

![]() |
Picture Courtesy: Vaishali Kute
|
ह्या आरश्यात पहा किंवा त्या आरशात,
खरं ‘दर्शन’ कधी होणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!
वस्त्र, ह्या दोर्याने शिवा अथवा त्या सुईने,
‘निर्वस्त्र’ झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान होणार नाही!
ह्या फुलाचा वास घ्या किंवा त्या फुलाचा,
स्वतःचा मूळ ‘वास*’ कधी उमजणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान ‘उघडणार’ नाही!
ह्या पाट्या शोधा किंवा त्या पाट्या,
‘शोधणारा’ हरविल्याशिवाय मात्र…
शोध नक्की संपणार नाही!
स्वतःच स्वत:ला भेटल्याशिवाय,
खरं समाधान ‘उघड’ होणार नाही!
समाधान कोठे आहे…!!!?
जेथे आहात तेथेच आहे … अगदी तेथेच… अगदी येथेच! J
(वास*- मूळ वस्ती… मूळ अस्तित्व!)
सप्रेम नमस्कार
जय गुरु
-नितीन राम
०७ सप्टेंबर २०११
http://www.abideinself.blogspot.com/
जेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली!